कृषी उत्पन्न बाजार समित्यांची रचना :
प्रत्येक बाजार समितीमध्ये पुढील प्रमाणे सदस्य असतील-
1. बाजार क्षेत्रात राहणारे (ज्यांची संबंधित मतदार यादीत नावे असतील आणि जे जिल्हाधिकारी किंवा जिल्हा उपनिबंधक यांनी याबाबतीत वेळोवेळी विनर्दिष्ट केलेल्या दिनाकांस एकवीस वर्षाहुन कमी वयाचे नसतील असे शेतकरी)
2. बाजार क्षेत्रास व्यापारी व अडते म्हणुन काम करण्यासाठी दोन वर्षाहुनही कमी नाही इतकया मुदतीची अनुज्ञप्ती धारण करणा-या व्यापा-यांनी निवडुन दिलेले सदस्य.
3. बाजार क्षेत्रात कृषी उत्पन्नावर प्रक्रीया करण्याचा किंवा त्याच्या खरेदी विक्रीचा धंदा करणा-या नोंदणीकृत कार्यालय त्याच बाजारक्षेत्रात असेल अशा सहकारी संस्थेचा सभापती.
4. बाजार क्षेत्र किंवा त्याचा मोठा भाग ज्या पंचायत समितीच्या अधिकारतेमध्ये असेल त्या पंचायत समिती सभापती / प्रतिनिधी
5. मुख्य बाजार ज्या स्थानिक प्राधिकारी संस्थेच्या अधिकारक्षेत्रामध्ये असेल (पंचायत समिती व्यतीरीक्त) त्या संस्थेचा अध्यक्ष / सरपंच / प्रतिनिधी.
6.संबंधित जिल्हयातील सहाय्यक निबंधक / उपनिबंधक तसेच सहाय्य्क वस्त्रोदयोग अधिकारी अथवा त्या ठिकाणी असलेले कृषी अधिकारी.