बाजार सुधारणा

मार्केट रिफॉम हा कक्ष महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास विनियमन) अधिनियम 1963 मधील तरतुदी प्रमाणे थेट पणन अनुज्ञप्ती, खाजगी बाजार अनुज्ञप्ती, शेतकरी ग्राहक बाजार अनुज्ञप्ती, व व्यापारी अनुज्ञप्ती देण्यासाठी पणन संचालनायलयात स्थापन करण्यात आलेला आहे.

मार्केट रिफॉम अंतर्गत खालील अनुज्ञप्त्या दिल्या जातात.

  • थेट पणन अनुज्ञप्ती
    कोणत्याही व्यक्तीला जर एक किंवा अधिक बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात थेट शेतक-यांकडून शेतमाल खरेदी करायचा असेल तर त्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास विनियमन) नियम 1967 मधील नियम 4 (ब) मधील तरतुदी नुसार थेट पणन अनुज्ञप्ती दिली जाते.
  • खाजगी बाजार
    जर कोणत्याही व्यक्तीला एक किंवा अधिक बाजार कार्यक्षेत्रात खाजगी बाजार स्थापन करावयाचा असेल तर त्यास महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास विनियमन) नियम 1967 मधील नियम 4 (क) मधील तरतुदी नुसार खाजगी बाजाराची अनुज्ञप्ती दिली जाते.
  • शेतकरी ग्राहक बाजार
    कोणत्याही व्यक्तीला जर शेतकरी ग्राहक बाजार स्थापन करावयाचा असेल तर त्यास महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास विनियमन) नियम 1967 मधील नियम 4 (ड) मधील तरतुदी नुसार शेतकरी ग्राहक बाजाराची अनुज्ञप्ती दिली जाते.
  • व्यापारी अनुज्ञप्ती
    कोणत्याही व्यक्तीला जर महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास विनियमन) नियम 1967 मधील नियम 6 (3 अ) मधील तरतुदी नुसार एक किंवा अधिक बाजार आवारात व्यापारी म्हणून कामकरण्यासाठी अनुज्ञप्ती देण्यात येते.
  • करार शेती
    महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास विनियमन) नियम 1967 मधील नियम 4 (ओ) मधील तरतुदीनुसार शेतमाल उत्पादक व करार शेती पुरस्कर्ता यांच्यामध्ये शेती करार नोदंणी करण्यात येते.

बाजार सुधारणा जलद दुवे