संघटनात्मक संरचना

संस्था स्वरूप

पणन विभाग हा सहकार वस्त्रोदयोग व पणन चा भाग आहे.सदर विभागाचे प्रमुख पणन संचालक असतात . ते तीन सहसंचालक यांच्या मदतीने कामकाजाचे नियमन करतात. सदर विभागाचे कामकाज तेरा मुख्य शाखांमध्ये व एका उपशाखेमध्ये वाटले गेले आहे.त्यांचे नियंत्रण सहसंचालकांकडुन केले जाते.प्रत्येक सहसंचालक एकापेक्षा जास्त शाखांचे नियंत्रण करतो. सध्या सहा उपसंचालक व सहा सहाय्यक संचालक आहेत.प्रत्येक शाखेकडे एक उपसंचालक ,एक सहाय्यक संचालक,एक कार्यालय अधिक्षक,एक वरिष्ठ लिपीक व एक कनिष्ठ लिपीक कामकाजासाठी असतात.लेखा शाखा ही 14 वी शाखा असुन त्याचे नियंत्रण लेखाधिकारी करतात. ते वित्त व लेखा विभागाचे असुन प्रतिनियुक्तीवर असतात.ते वित्त व लेखा संबंधी कामकाज बघतात. क्षेत्रिय पातळीवर पणन विभागाचे कामकाज हे विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक , सहाय्यक निबंधक यांचेकडुन केले जाते. 

पणन संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणे कार्यालयाची आस्थापनाविषयक माहिती
पणन संचालनालयातील पदांच्या आढाव्याबाबत (मार्च 2025)
अ.क्र. पदनाम सध्याची मंजूर पदे कार्यरत
 पदे
रिक्त पदे
1 3 6 7 8
1   संचालक 1 1 0
2   सहसंचालक 3 2 1
3   उपसंचालक 6 4 2
4   उप अभियंता 1 0 0
    वर्ग-1 एकुण 11 7 4
5   सहाय्यक संचालक 6 6 0
6   लेखाधिकारी 1 1 0
    वर्ग-2 एकुण 7 7 0
7   लघुलेखक, उच्चश्रेणी
  (स्वीय सहाय्यक)
1 1 0
8   लघुलेखक (निम्नश्रेणी) 3 0 3
9   कार्यालय अधिक्षक 4 4 0
10   मुख्य लिपीक 11 10 1
11   वरिष्ठ लिपीक 24 14 10
12   कनिष्ठ लिपीक 22 0 22
13   वाहन चालक 4 1 3
    वर्ग-3 एकुण 69 30 39
14   नाईक 2 2 0
15   रोनिओ ऑपरेटर 1 1 0
16   झेरॉक्स ऑपरेटर 1 1 0
17   शिपाई 8 1 7
    वर्ग-4 एकुण 12 5 7
  एकुण पदे- वर्ग-अ ते वर्ग-ड 99 49 50