Sale and Purchase Overview

खरेदी विक्री सहकारी संघ

महाराष्ट्र राज्यातील खरेदी विक्री संघांची व्दिस्तरीय कार्यपध्दती आहे. सन 2024-25 मध्ये जिल्हा स्तरावर 14 व  तालुका स्तरावर 331 असे  एकूण 345 खरेदी विक्री संघ आहेत.

खरेदी - विक्री संघाची सद्यस्थिती

विभाग

एकूण संघ

चालू

बंद

अवसायनात

नोंदणी रद्द

नफयात

तोटयात

कोकण

36

34

00

02

00

33

03

पुणे

26

21

03

02

00

15

06

कोल्हापूर

41

39

01

01

00

25

16

नाशिक

57

57

00

00

00

33

24

छ. संभाजीनगर

32

26

02

02

01

10

21

लातुर

42

32

00

08

02

19

21

अमरावती

55

53

00

02

00

34

21

नागपूर

56

49

01

06

00

36

19

एकूण

345

311

7

23

3

205

131

 

महाराष्ट्रात जिल्हा स्तरावर जिल्हा खरेदी विक्री संघ व तालुका स्तरावर तालुका खरेदी विक्री संघ स्थापन करण्यात आले आहे.  

खरेदी - विक्री संघ विविध कार्य बजावतात जसे -

  • शासनासाठी नोडल एजन्सी म्हणुन काम करणे .
  • कृषि उत्पादनांच्या विक्रीची व्यवस्था करणे.
  • कृषि उत्पादन वाढवण्यासाठी शेती उपयोगी साधने, खते, बियाणे इ. ची विक्री करणे .
  • गावाच्या सोयीसाठी स्वस्त धान्य दुकाने चालविणे.
  • पेट्रोल पंप चालविणे.
  • शेतकऱ्यांचा शेतमाल तारण ठेवून काही उचल देणे
  • शेतक-यांच्या सर्वागीण विकासासाठी विविध कार्ये करणे.
  • शेतकऱ्यांच्या शेतमालाची विक्री करून जास्तीत जास्त भाव मिळवून देणे